Home » जळगाव » म्हसावद रेल्वे गेट १० जुलै पर्यंत बंद ; पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

म्हसावद रेल्वे गेट १० जुलै पर्यंत बंद ; पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

म्हसावद ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वे स्टेशन प्रबंधक म्हसावद, यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर कार्यालय (रेलपथ) पाचोरा, यांचेकडून एक पत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार म्हसावद स्टेशन मधील रेल्वे गेट क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी दिनांक ०५ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजे पासून ते दिनांक १० जुलै २०२४ संध्याकाळी ०६.०० वाजे पर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, म्हसावद स्टेशन मधील रेल्वे फाटक क्रमांक १४४ वर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे व छनाई, स्लीपर बदलणे साठी चे काम करण्यात येणार असल्याने हे गेट दिलेल्या कालावधीत वाहतुकी साठी बंद ठेवण्यात येणार आहे, तरी गावकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी व पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ अनुभाग अभियंता (रे.प.) मध्य रेल्वे पाचोरा यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!