Home » जळगाव » के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनासोबतच १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन ओळखला जातो. कामगारांच्या हक्कासाठी आणि न्याय वेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा.  संजय पावडे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, अकॅडमिक डीन डॉ सी.एस. पाटील, आय क्यू ए सी समनव्यक प्रा. कल्पेश महाजन, एच.आर. विभाग प्रमुख प्रा.श्रुतिका घरडे, शारीरिक शिक्षण क्रीडा संचालक प्रा.नितीन चौधरी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यपक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!