शिरसोली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले, सदर शिबिराला इयत्ता आठवी ते बारावीच्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सदर शिबिरासाठी ॲड. केतन सोनार, ॲड.ऐश्वर्या मंत्री तसेच कायदेविषयक व विधी विभागात कॉन्सिलर म्हणून भारती कुमावत हे उपस्थित होते. सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष प्रवीण पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक निलेश खलसे होते.

सदर शिबिराला ॲड. केतन सोनार यांनी विद्यार्थ्यांना बाल गुन्हेगार व लैंगिक अत्याचार बाबत कायदा विषयक माहिती दिली. ॲड.ऐश्वर्या मंत्री यांनी पोस्को कायदा विषयी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी भारती कुमावत यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व बालवयातील चुका याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी.जी. कुलकर्णी यांनी केले तर आभार आर.के. पाटील यांनी मानले सदर शिबिराला पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, सुनील भदाणे, मनोज बारी, सुनील ताडे, आकांक्षा निकम यांचे सहकार्य लाभले .
