Home » जळगाव » पी.एम.मुंदडे विद्यालयात “सायबर सुरक्षा” या विषयावर व्याख्यान

पी.एम.मुंदडे विद्यालयात “सायबर सुरक्षा” या विषयावर व्याख्यान

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पिंप्राळा उपनगरातील पी.एम.मुंदडे माध्यमिक विद्यालय येथे आज दि.३० रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील विद्यार्थी प्रमोद विनोद सोन्नी व प्रतीक संजय उगले यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणेसाठी अनमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी सर्व प्रथम दोन्ही विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत यांनी केले. त्यानंतर प्रमोद सोन्नी व प्रतिक उगले यांनी

  • आपल्या मोबाईलसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
  • आपले इंस्टाग्राम खाते खाजगी ठेवा.
  • कोणालाही ओटीपी शेर करू नका.
  • क्रेडिट कार्ड फसवणूक.
  • ऑनलाइन गेम फसवणूक.
  • मोबाईलचे व्यसन.
  • ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड.
  • डिजिटल फूटप्रिंट.
  • ॲप परवानग्या.
  • सायबर बुलिंग.

अशा अनेक विषयांवर सखोल असे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जगदीश बियाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक रमेश शिरसाठ, प्रभाकर वाल्डे, सुनीता पाटील, रंजना चौधरी मॅडम, संजीव तडवी शिक्षकेतर कर्मचारी संजय बेलदार, संजय कुलकर्णी, कोमल सिंग पाटील, तुकाराम महाराज, नरेंद्र ठाकुर आदिंनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!