Headlines
Home » महाराष्ट्र » राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू ; महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये

राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू ; महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना राज्यात लागू केल्याने विधानभवन परिसरात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण करुन राखी बांधत त्यांचे आभार व्यक्त केले. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केल्याने त्यांना महिलां कडून राखी बांधण्यात आली. मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कालच या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. आज विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधत त्यांचे आभार मानले.

‘लाडकी बहिण योजना’ योजनेंतर्गत महिलांना सन्मान निधी मिळणार आहे. २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना सरकार प्रती माह १५०० रुपये निधी देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होणार आहेत.

या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहून जास्त महिलांना होणार आहे. राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान राज्यात महिलांना एसटी महामंडळात अर्धे तिकीट योजना गेल्यावर्षी लागू केल्यामुळे महिलांना एसटी प्रवास करतांना मोठा फायदा झाला आहे. तसेच तरुणींना एसटी महामंडळ शिक्षणासाठी पदवीपर्यंत मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!