Home » जळगाव » के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिना निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने १९ नोव्हेबर २०१५ पासून हा दिवस साजरा करणे सुरू केले. तसेच २६ नोव्हेंबरला देशभरात राष्ट्रीय कायदा दिवसही साजरा केला जातो. संवैधानिक आदर्शांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘हमारा संविधान, हमारा सन्मान’ हे अभियान (Hamara Samvidhan, Hamara Samman campaign) सुरू करण्यात आले आहे.

२६ नोव्हेंबर १९४९ ला भारतात सविंधान स्वीकारले गेले होते. यावेळी संविधान सभेने संविधान स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

  • •१ डॉ.बी.आर. आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
    •२ सन २०१५ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २६ नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
    •३ संविधान दिनाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व सांगणे हा आहे.
    •४ संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. हे भारतीय नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देते आणि बंधुत्व वाढवण्याचा प्रयत्न करते.
    •५ भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
    •६ भारतीय संविधानाने देशाप्रती नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत तत्त्वे आणि कर्तव्ये यांची तरतूद केली आहे.

ही माहिती जाणून घेतल्याने आपल्या जीवनात संविधानाचे महत्त्व समजण्यास मदत होते. संविधान दिन आपल्याला नागरिक म्हणून आपले हक्क कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तसेच आपल्या देशाच्या मूल्यांची आठवण करून देते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय संजय सुगंधी यांनी संविधानाची ओळख व महत्व सांगितले. संविधान दिन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आर. सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ.सी.एस.पाटील, ह्यूमन रिसोर्स विभाग प्रा.गणेश पाटील व प्रा.श्रुतिका गाडफळे, प्रा. अविनाश सूर्यवंशी, प्रा.राहुल पटेल, प्रा.प्रसाद कुलकर्णी, प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा.सचिन नाथ, डॉ.वीणा भोसले, डॉ.एस.आर. पाटील, प्रा.शेफाली अग्रवाल व सर्व विभाग प्रमुख, तसेच प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!