Headlines
Home » महाराष्ट्र » एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मला मान्य !

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मला मान्य !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील आपल्या निवास्थानी पत्रकार घेतली. मुख्यमंत्री निवडीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार परिषदेच्या सर्वात आधी त्यांनी मागील अडीच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. विवध योजनांचे फलित म्हणजे विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीला मिळालेले घवघवीत यश होय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये महायुतीला मोठं यश मिळाले असून महायुतीचे तब्बल २३० उमेदवार विजयी झाले. आणि लाडका भाऊ म्हणून माझी प्रतिमा निर्माण झाली ही माझ्यासाठी मोठी बाब असल्याचे सांगितले.

राज्यात महायुतीचे सरकार आले असले तरी मात्र आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असतानाच काळजवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सरकार स्थापण्यात आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नसून भाजपाकडून वरिष्ठांकडून जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल, असे सांगत एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. तसेच उद्या अमित शाह यांच्या सोबत उद्या तिन्ही पक्षांची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!