जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागातर्फे अल-गो-रिदम 2.o या संकल्पनेतून फ्रेशर्स २के २४ चे महाविद्यालयातील नवीन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. फ्रेशर्स २के २४ कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवर डॉ.अमोल देशमुख व महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार सोबत प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांचे हस्ते करण्यात आले .
यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त स्वतः उपजत असलेले सुप्तगुण व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. सुगंधी यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण एम एच १९ कॉमेडीज रील स्टार उपस्थित मंचावर हरीश नेरकर, आदित्य पाटील, चेतन पाटील, भूषण परदेशी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा, प्राध्यापकांशी आणि वर्गमित्र, मैत्रिणींसमवेत शिक्षण घेताना संवाद वाढवा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी फ्रेशर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अल्पोहाराचा आनंद घेतला.
दरम्यान कार्यक्रमात गायन, नृत्य, एकांकिका, रॅम्प वॉक, समुहगान, फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात एकूण १९ नृत्य प्रवेशिकात सोलो डान्स ११ व समूह नृत्य ८, तर गायन स्पर्धेत ६, फॅशन शो मध्ये ५० प्रवेशिका होत्या. फॅशन शो मधील विजेत्यांना घोषित करण्यासाठी ४ राऊंड झाले. त्यात परीक्षक म्हणून प्रा. हर्षा देशमुख व प्रा. किरण पाटील हे होते. मुलांच्या फेरी मध्ये पहिल्या फेरीला विजय सोनवणे, शंतनू बाविस्कर व अमित शिरसाठ, तर मुलींमध्ये इशा पाटील आणि कपल राऊंड मध्ये पूजा पाटील व शंतनू बाविस्कर प्रथम तर प्राची विसपुते व यश पाटील यांना द्वितीय विजेते घोषित करण्यात आले.

सोलो डान्स मध्ये भूमी जोशी प्रथम, तर द्वितीय इशा पाटील द्वितीय, तसेच समूह नृत्यामध्ये रेट्रो गर्ल्स आणि ई अँड सी ग्रुप, गायन स्पर्धेत प्रथम अपर्णा खारे व द्वितीय प्रवीण चव्हाण यांना विजेते घोषित करण्यात आले.
सर्व स्पर्धेतून द्वितीय वर्षातील विद्यार्थी मिस फ्रेशर्स शिंपी सिद्धी तर मिस्टर फ्रेशर्स प्रवीण चव्हाण आणि प्रथम वर्ष विभागातून मिस फ्रेशर्स कल्याणी धनगर व मिस्टर फ्रेशर्स केतन जोशी यांची निवड झाली. उत्कृष्ट सूत्रसंचालन पूर्वा नेवे व दुहेरी जोडी मध्ये गौरी पाटील व राज पवार यांना पारितोषिक मिळाले.
सर्व विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.सचिन नाथ यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
