Home » होम » के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन  सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी या परिसर मुलाखतीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी ए आर एम एस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी हजर होते.

मुलाखतीत विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, सवांद, मिळवलेले गुण यावर एकूण २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात २१ विद्यार्थी के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव मधील आणि इतर महाविद्यालयातील ३ असे एकूण २४ जण निवड यादीत आलेत. मुलाखतीला विविध शाखेचे विद्यार्थी हजर होते.

परिसर मुलाखतीचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मनीष महाले यांनी केले. या प्रसंगी के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला आय क्यू ए सी समनव्यक प्रा. कल्पेश महाजन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, प्रा. राहुल पटेल, प्रा. सचिन नाथ यांची उपस्थिती होती .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!