Headlines
Home » जळगाव » मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जळगाव क्लायमेट वॉरियर उपक्रम संपन्न

मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जळगाव क्लायमेट वॉरियर उपक्रम संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जळगाव क्लायमेट वॉरियर मोहीम अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त शाळा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक हे किती अपायकारक व हानिकारक आहे, प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर योगी संघटना समन्वयक तसेच क्लायमेट वॉरियर चे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर आपल्याला प्लास्टिक कसे टाळता येईल, यावर तज्ञ मार्गदर्शक गिरीश पाटील यांनी वेगवेगळे उदाहरणे देऊन, प्रश्न उत्तराच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी पहिले पाऊल म्हणून विद्यार्थ्यांनी स्टीलच्या जेवणाचा डबा व स्टीलची पाण्याची बाटली वापरावी व पुस्तक व वह्यांना कागदी कव्हर लावावे असे मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरता स्टील डबा, पाण्याची स्टीलची बाटली वापरावी, पुस्तक  व वह्यांना कागदी कव्हर लावावे असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गिरीश जाधव यांनी केले. यावेळी अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ, गिरीश जाधव, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!