विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .
आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज खेळ सुरु केला . आजही आपल्या खेळातील आक्रमकता कायम ठेवत कसोटी कारकीर्दमधील आपले पहील्या द्विशतकाची नोंद केली . १९२ धावांवर असतांना बशीरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार व पुढच्याच चेंडूवर चौकार ठोकून द्विशतक पूर्ण केले .जैस्वाल २०९ धावांवर असतांना जेम्स ऍडर्सनने त्याला बाद केले . जैस्वालने २९० चेंडूत १९ चौकार व ७ षटकार ठोकले .भारताच्या सुरवातीच्या व मधल्या फळीतील इतर सगळ्याच फलंदाजांनी निराशा केली . यशस्वी जैस्वाल नंतर शुभमन गिल ची ३४ ही धावसंख्या सर्वाधिक ठरली .
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरवात खराब झाली . दुसऱ्या डावात आपल्या ७ बाद १८३ धावा झाल्या असुन स्टोक १७ व अहमद ७ धावांवर खेळत आहेत . भारताकड़ून बुमराह व कुलदीप यादवने प्रत्येकी ३ गड़ी बाद केले तर अक्षर पटेल ने १ गड़ी बाद केला .
