जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठस्तरीय आंतर महविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ मध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळालेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच एस.एस. मणियार विधि महाविद्यालय, आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पालकांसमवेत गुणगौरव सोहळा जुना कॉन्फरन्स सभागृहात करण्यात आला. तसेच पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरणाने दाद मिळवली. यावेळी केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि उपाध्यक्ष प्रकाश पाटील, डी.टी.पाटील, प्रमोद पाटील, प्रविणचंद्र जंगले, डॉ.हर्षवर्धन जावळे, संजय प्रभुदेसाई, रुपेश चिरमाडे, भालचंद्र पाटील, प्रा.शिल्पा बेंडाळे, श्रीकांत मणियार आणि मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे उपस्थित होते.

या गुणगौरव सोहळ्यात सुवर्ण पदक आणि विजेत्या विद्यार्थ्यांना रुपये एक हजार रोख आणि इतर विजेत्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि व्यवस्थापन मंडळ यांनी ओजास्विनी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, पियुष बडगुजर, पुरुषोत्तम घाटोळ, ऋषी इसाने, दिगंबर शिरसाळे, संगीत विभाग कपिल शिंगणे, देवेंद्र गुरव, नृत्य विभाग अजय शिंदे, नाट्य विभाग हेमंत पाटील, वैभव मावळे यांचे कौतुक आणि विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.

या गुणगौरव सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर वाद्य) राजेश्वरी रत्नपारखी, ललित कला प्रकारात कुंजल जाधव, देवा सपकाळे, समय चौधरी, गौरी चौधरी, तौसीफ शेख, दिशा पवार आणि वकृत्व स्पर्धा वैष्णवी पाटील, व नृत्य कला प्रकारात हिमानी महाजन यांना सन्मानित करण्यात आले. तर भारतीय शास्त्रीय गायन प्रकारात मयुरी हरीमकर, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (ताल वाद्य)चेतन माळी, नाट्यगीत अनुजा मंजुळ, भारतीय लोकसंगीत वाद्य वृंद अनुज पाटील, प्रणव सोनावणे, रितेश भामरे, जयेश वाणी, चेतन माळी, ओम जवनजळकर, राजेश्वरी रत्नपारखी, आर्यन भोईटे, सलोनी मोरे, इंद्रधनुष्य स्पर्धेतील विजेते कुंजल जाधव, देवा सपकाळे, समय चौधरी, गौरी चौधरी, तौसीफ शेख, नाट्यशास्त्र विद्यार्थी हिमानी महाजन, स्वाती संधान, सिद्धी कुलकर्णी, ज्योती पाटील, गोपाल मोरे, महेंद्र मराठे, विश्वजित कोळी, यश कल्याणी, लोकेश मोरे, श्रेया जोशी, रितिका सपकाळे, ख़ुशी पावरा, अनुष्का परिहार, हिमानी पाटील, अनुश्री सावकारे, दुर्गेश्वरी झोपे, वैदेहि कोळी, अमिता महिरे, सानिका फेगडे, भारतीय शास्त्रीय संगीत दीपिका घैसास, वादविवाद स्पर्धा केतन शिरतुरे, अल्ताफ तडवी, मानस नाईक, कथ्थक संकेत वारुळकर या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी तर सूत्रसंचालन प्रसाद देसाई आणि योगेश महाले यांनी केले.
