Home » जळगाव » “अटल वयो अभ्युदय योजना” विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर

“अटल वयो अभ्युदय योजना” विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आमचे जेष्ठ, आमचा अभिमान“ या अभियानंतर्गत “अटल वयो अभ्युदययोजना” विषयी जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम.च्या माध्यमातून राबविण्यात येणार असून अटल वयो अभ्युदय योजने सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे रेडिओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले.

जळगाव शहरातील गणेश कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील ‘जेष्ठ नागरिक मंडळ’ या ठिकाणी ५०-६५ वयोवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत अटल वयो अभ्युदय योजनेबद्दल कार्यक्रम घेण्यात आला. प्रज्ञावंत नंदकूमार बेंडाळे अध्यक्ष खांदेश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी, जळगाव यांच्या संकल्पनेतून साकार झालेले रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम. जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे देशमुख म्हणाले.

यावेळी हास्य परिवार यांचेसह जेष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी रेडियो मनभावनने प्रस्तुतकेलेली संवाद नाटिका श्रोत्यांना एेकवण्यात आली. वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या टोलफ्री नंबर १४५६७ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सोडवण्यात येईल तसेच बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी कांचन पाटील, प्रिया सफळे, राहुल पाटील, साहिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!