जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.एस. डाकलिया,सचिव विश्वनाथ जोशी, सदस्य डॉ. विजय सरोदे, देवेंद्र अग्रवाल, दयानंद केसवानी, कमल पारेख, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच पालक सदस्या अर्चना पाटील व सोनाली चौधरी यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले, तर संस्थेचे अध्यक्ष डॉ. डाकलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी खुशवंती पंडित जाधव व सुप्रिया महेंद्रसिंग पाटील या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थोर व्यक्तींच्या वेशभूषा केल्या

यात नीता वानखेडे- राणी लक्ष्मीबाई, पूजा वाघ- भारत माता, नैतिक सोनवणे -लोकमान्य टिळक, हर्षाली पाटील -भारत माता, पियुष माळी -डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चिराग वानखेडे- महात्मा गांधी, तर प्रतीक राजपूत- भगतसिंग, सिद्धी कापडे- बहिणाबाई यांच्या भूमिका करून त्यांचे विचार थोडक्यात मांडले.
यानंतर निधीका महाजन, मोक्षदा सूर्यवंशी व योगिनी राठोड या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शुरांची गाथा आपल्या शब्दातून मांडली. पालक शिक्षक संघातर्फे होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्ग मंत्री मंडळातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. शाळा मंत्री वैष्णवी बडगुजर इयत्ता दहावी हिने आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सदस्य डॉ. विजय सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक भावनिक व शारीरिक विकास कशा रीतीने घडवावा याबाबतीत मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा थोर नेत्यांविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष डॉ.आर.एस. डाकलिया यांनी स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या विकासाबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जाधव तर आभार मनोज बावस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
