Headlines
Home » जळगाव » मू .जे. महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्याविषयी ग्रंथ प्रदर्शन

मू .जे. महाविद्यालयात स्वातंत्र्य लढ्याविषयी ग्रंथ प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने स्वातंत्र दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी सरस्वती पूजन व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. व्ही. एस. कंची यांनी ‘स्वातंत्र्याचे मूल्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी प्रा.आर बी. गायकवाड, प्रा.राम बुधवंत, प्रा. नीलेश चौधरी, नितीन पाटील, पी.आर. जोशी, विद्या राजहंस, योगेश पवार, सुभाष राठोड, विवेक भारंबे, मुकेश पाटील, महेश सावदेकर, लखीचंद महाजन, सोनिया मस्के, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!