Home » राष्ट्रीय » पश्चिम बंगालमध्ये कंचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची भीषण धडक ; ८ ठार तर ५० जखमी

पश्चिम बंगालमध्ये कंचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची भीषण धडक ; ८ ठार तर ५० जखमी

Kanchenjunga Express Accident :पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला असुन मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून येणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने मागून धडक दिली.

दार्जिलिंग ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये आज सकाळी आगरत- सियालदाह कंचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात आज सकाळी झालेल्या भीषण धडकेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी येथे घडली. या घटनेमध्ये कांचनगंगा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याचे समजते. दरम्यान, रेल्वे अपघात घडल्याचे समजताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटानास्थळी दाखल झाले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही घटनेची नोंद घेतली आहे.

दरम्यान, अपघात घडले ते ठिकाण दुर्गम भागात असुन आणि तेथे पाऊसही सुरु असल्याने मदत कार्यात अडथळा येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनबद्दल सोशल मीडिया मंच X वर शोक आणि चिंता व्यक्त केली आहे.

अपघातानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु :
अपघातानंतर जखमी रेल्वे डब्यात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय सेवेसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. या दुर्घटनेत ८ ठार तर ५० जखमी झाल्याची माहिती मिळतं आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचुन बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडी जवळ झालेल्या या भीषण अपघाताचे कारण अद्याप स्पस्ट झाले नाही.

घटनास्थळी व परिसरात मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा :
सिलीगुडीमध्ये मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. या अपघातामुळे कोलकाता आणि सिलीगुडी दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली असुन परिणामी लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांचनजंगा एक्सप्रेस सोमवारी सकाळी वेळापत्रकानुसार न्यू जलपाईगुडी स्थानकावरून निघाली. नीचबारी आणि रंगपाणी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीने एक्सप्रेसला पाठीमागून धडक दिल्याने ही टक्कर झाली, ज्यामुळे मागील दोन डब्बे रुळावरून घसरले आणि उलटले.

घटनास्थळावरील काही दृश्ये आणि छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आहेत आणि व्हायरलही झाली आहेत. ज्यामध्ये पाहायला मिळते की, ज्यामध्ये एक डब्बा चिरडला गेला आणि दुसरा रुळावरून उलटला गेला. तसेच मालवाहू गाडीच्या इंजिनवर एक्सप्रेसचा डबा दिसत आहे. स्थानिक रहिवासी बचाव कार्यात सामील झाले आहेत.

अपघाताचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. त्यासाठी आवश्यक माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. टक्कर होण्यापूर्वी कांचनजंगा एक्स्प्रेस स्थिर होती का, सिग्नल बिघडले होते का आणि दार्जिलिंगमधील प्रतिकूल हवामानाची भूमिका होती का याचाही अधिकारी शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!