मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच त्रेधा उडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे.

दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या दि.९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या व मंडळाच्या शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी गैरसोय होऊ शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
