Home » जळगाव » राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत डॉ. जयंत इंगळे यांचे यश

राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत डॉ. जयंत इंगळे यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ( वास्तव पोस्ट ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्याद्वारे शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, एम. जे. कॉलेज, जळगाव येथील डॉ. जयंत पंडित इंगळे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.

स्पर्धेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात त्यांनी प्रस्तुत केलेल्या इंग्रजी विषयातील ‘ड्राफ्टिंग ए व्हर्च्युअल मॅसेज’ या शैक्षणिक व्हिडिओला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम अशी आहे. महाविद्यालयातर्फे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!