Home » जळगाव » कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला

कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्रातर्फे ‘ गुरू समर्पण ‘ हा सांगीतिक कार्यक्रम रंगला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन के. सी . ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे, नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन आणि वादन सादर केले. यात श्रावणी देशपांडे, फाल्गुनी सूर्यवंशी, मोक्षा चौधरी, हर्षराज खडके, शर्वरी श्रावगे, डॉ. पूनम समनपुरे, ज्योती पाटील, पूजा भट, श्रीकांत पाटील या विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. गौरव पाटील, जयेश चौधरी, नितेश सूर्यवंशी, कुलदीप बारी या विद्यार्थ्यांनी बासरी वादनाने गुरु अभिवादन केले. सोहम पाटील, रोहन पाटील ऋषिकेश पाटील, कुशल पाटील, भूषण काटोले या विद्यार्थ्यांनी तबलावादन सादर करुन रसिकांची मने जिंकली.

प्रा.कपिल शिंगाणे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. देवेंद्र गुरव, प्रा.मयुरी हरिमकर, प्रसाद कासार, मंगेश वाघ, प्रा.पियूष बडगुजर, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!