Home » क्रीडा » ओरियन सीबीएसईच्या कौस्तुभ जंजाळे याला सुवर्णपदक

ओरियन सीबीएसईच्या कौस्तुभ जंजाळे याला सुवर्णपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अकोला येथे झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कौस्तुभ राजेंद्र जंजाळे याने सहभाग घेतला होता. त्याची कोटा (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कौस्तुभ याने १४ वर्षे आतील वयोगटातील ५० किलो वजन गटात कुमिते म्हणजे फायटिंग या खेळ प्रकारात सहभाग घेतला होता. यात त्याने सुवर्णपदक पटकावून नावलौकिक प्राप्त केला. तसेच राजस्थान कोटा येथे होणाऱ्या ५ व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी कौस्तुभ याची निवड झाली आहे.

कौस्तुभ याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी कौतुक केले. तर मुख्याध्यापिका सुषमा कंची यांनी कौस्तुभ याचा गौरव केला. त्याला क्रीडा शिक्षक पंकज वराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील आणि प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी देखील या यशाबद्दल कौस्तुभचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!