Home » जळगाव » आदिवासी समाजातुन पहिल्या आय.ए.एस. अधिकारी वेवोतोलू केझो यांचा सन्मान

आदिवासी समाजातुन पहिल्या आय.ए.एस. अधिकारी वेवोतोलू केझो यांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केझो यांचा सन्मान केला. नागालँड येथील आदिवासी समाजातून पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान वेवोतोलू केझो यांना मिळाला असून सध्या त्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी म्हणून जळगाव येथे रुजू आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सर्व सदस्यांना या गोष्टीचा अभिमान असल्याचे सांगून आपल्याला व्यक्तीश: खुप आनंद झाल्याची भावना आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी व्यक्त केली. तालुक्यातील आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी येथे दिलेल्या भेटीवेळी व स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तसेच आदिवासी बांधवांसाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करुन अध्यक्ष आंतरसिंग आर्या यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. अंतर सिंह आर्य हे जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!