Home » जळगाव » डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर मार्गदर्शन

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उल्हास पाटील विधी महाविद्यालयात भुषण काळे प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश जामनेर यांनी करिअर गाईडन्स यात विधी क्षेत्रातील विविध संधी या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विधी क्षेत्र हे अतिशय व्यापक असून त्यात विद्यार्थी आपले करिअर कसे घडवू शकतो याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

तसेच विधी क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध असून याचा विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून जरूर विचार करावा असेही काळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.

प्र.प्राचार्य डॉ. नयना महाजन (झोपे) यांनी शाल व श्रीफळ देऊन न्यायाधीश काळे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडवोकेट रवींद्र सिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!