चोपडा ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील चुंचाळे येथील ज्ञानयोग फाउंडेशनच्या संयुक्तमाने चुंचाळे जिल्हा परिषद शाळेत दि.२६ रोजी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानयोग फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश पाटील यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही फराळाचे वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मौजे हिंगोणा जिल्हा परिषद शाळा मजरे तसेच माध्यमिक विद्यालय हिंगोणा या ठिकाणी संस्थेमार्फत विद्यार्थी विद्यार्थिनींना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम घेऊन फरसाण फराळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अविनाश पाटील होते. तसेच केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, निवृत्त आदर्श शिक्षक जिजाबराव पाटील, डॉ.सुनील चौधरी, सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ता संजय महाजन, नाना शिंदे, मुख्याध्यापक प्रमोद पाटील तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच ज्ञानयोग फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध उपक्रमही राबवले जातात. ज्ञानदेव फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्याकडून प्रदूषण होईल असे फटाके आम्ही फोडणार नाही व पर्यावरण पूरक दिवाळी साजरा करावी, असे विद्यार्थी विद्यार्थिनींना आवाहन करण्यात आले.
