Headlines
Home » जळगाव » वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने बाहेरपुरा भागात मोफत मतदार नोंदणी अभियान

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने बाहेरपुरा भागात मोफत मतदार नोंदणी अभियान

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सौजन्याने मोफत मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियानास आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी वैशालीताईंच्या उपस्थितीत अभियानास सुरुवात करून नोंदणी करण्यास नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यात आल्या. तसेच परिसरात नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करून सहकार्याची भुमिका पार पाडली.

या दरम्यान १८ वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार व मतदार यादीतून ज्यांचे नाव गहाळ झालेले तसेच नाव – पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, मोबाईल नंबर अपडेट करणे अश्या विविध सुविधा नोंदणी अभियानात दिल्या गेल्यामुळे नागरिकांना सोयीस्कर झाले.

हे नोंदणी अभियान पार पाडण्यासाठी अनिल सावंत, संदीप जैन, दादा भाऊ चौधरी, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, हरिष देवरे, निखिल सोनवणे, प्रविण वाघ, प्रविण शिंपी, आवेश खाटीक, दिपक भोई, राहुल सोनवणे, राहुल चौधरी, नितीन खेडकर, अमोल मिस्तरी, मयंक भामरे, सागर बागुल, ओम पाटील, दादू भोई, इ. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!