Home » जळगाव » गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरात दि.७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी. बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी- डी मार्ट- मोहाडी रोड Y पॉईंट- गायत्री नगर- गणेश घाट- सेंट टेरीसा स्कुल- हॉटेल ग्राप्पेस- मलंगशहा बाबा दर्गा- शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान मार्ग बंद राहील.

तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता)- इच्छादेवी चौकी- डि मार्ट- मोहाडी रोड Y पॉईंट- गायत्री नगर- गणेश घाट- सेंट टेरीसा स्कुल- हॉटेल ग्रॅपेस- मलंगशहा बाबा दर्गा- शिरसोली रोडवरील वाहतुक जळगाव कडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.

जळगाव कडून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक- काव्यरत्नावली चौक- महाबळ चौक- संत गाडगेबाबा चौक- राजे संभाजी चौक (मोहाडी रोड)– गुरू पेट्रोलपंप (G मॉल)- मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणाऱ्या कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा- गुरू पेट्रोलपंप (G मॉल)- राजे संभाजी चौक (मोहाडी रोड)- संत गाडगेबाबा चौक- महाबळ चौक- काव्यरत्नावली चौक- आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.

आसोदा- भादली कडून जळगाव कडे येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज- गजानन मालुसरे नगर- जुने जळगाव- लक्ष्मी नगर- कालंका माता मंदीर मार्गे- महामार्गावरुन अजिंठा चौक- आकाशवाणी चौक- नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील.

पाचोरा कडून येणाऱ्या जड वाहनांकरीता वावडदा- नेरी- अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!