Headlines

मानव सेवा विद्यालयात विद्यार्थी स्वागत सोहळा संपन्न

“शाळेचा पहिला दिवस चला जाऊ शाळेला” जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि १६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरवात झाली. शासन आदेशानुसार आज शाळे च्या पहिल्या दिवशी मानव सेवा विद्यालय जळगाव येथे विद्यार्थी स्वागत सोहळा वाजत गाजत आणि मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, सहसचिव राजकुमार सेठिया, सदस्य…

Read More

महावीर क्लासेसच्या आयआयटी, नीट, सीईटी, फाउंडेशन बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आयआयटी, नीट व एमएचटी-सीईटीची अचूक तयारी करवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथील महावीर क्लासेसच्या बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू असून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या सर्व बॅचेस सुरू होत असल्याची माहिती महावीर क्लासेसच्या वतीने देण्यात आली. महावीर क्लासेस चे वैशिष्ट्य म्हणजे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रवेश…

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी व शिक्षकवृंद जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे…

Read More

ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कुल ची १००% उज्ज्वल यशाची परंपरा कायम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) निकालात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड विद्यालयाने आपली गौरवशाली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.विद्यालयातून प्रथम – रोहन संदीप पाटील ९९%, द्वितीय – अनुश्री…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२…

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खासगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल ला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील पारतोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते…

Read More

जळगाव शहरातील परीक्षा केंद्रावर ४७३ विद्यार्थ्यांनी दिली AISSEE-2025 परीक्षा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा  पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची  सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. के.सी.ई. सोसायटी संचलित ओरीयन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया…

Read More

झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत…

Read More

मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात आज दि. ८ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारुन आपल्या…

Read More

महाविद्यालयीन विद्द्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्कील कार्यशाळेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि.२८ रोजी सकाळी १० ते सायं ५.०० या वेळेत सॉफ्ट स्कील या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना मिळालेल्या PMUSHA या केंद्रशासनाच्या उपक्रमावर आधारित आहे. कार्यशाळेचे नियोजन के.सी.ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र…

Read More

मॅथेक्स महाराष्ट्र जिल्हास्तरीय परीक्षेत दिशा राणे प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील बुध्यांकाचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने मॅथेक्स गणित प्राविण्य या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमध्ये जिल्हास्तरातून विद्यार्थी प्रविष्ट होतात. ज्यामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलची दिशा गिरीश राणे ही इयत्ता आठवीची विद्यार्थीनी गणित प्राविण्य मॅथेक्स या परीक्षेमध्ये लेवल एक मध्ये जिल्हास्तरीय…

Read More

नीलिमा बऱ्हाटे यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील केमिस्ट्री विषयाच्या शिक्षिका नीलिमा स्वप्निल बऱ्हाटे यांना श्री सत्यसाई विद्यापीठ अँड टेक्नॉलॉजी मेडिकल सायन्स सिहोर (मध्यप्रदेश) विद्यापीठाने पीएच. डी पदवीने सन्मानित केले आहे. त्यांनी सिंथेसिस ऑफ हायड्रोसायक्लिक कंपाउंड अँड बायोलॉजिकल एप्लीकेशन या विषयावर डॉ. सी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक संपदा सायबर सुरक्षा आणि न्यायव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयावर दि २२ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनयना आर. भांगडिया झवर हे असणार आहेत. यावेळी कवयित्री बहिणाबाई…

Read More

केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी ३१ विद्यार्थ्यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील ३१ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाद्वारे संस्कृत भाषेच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. संपूर्ण देशभरातील…

Read More

नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

Read More
error: Content is protected !!