म्हसावद स्वा.सै.पं.ध.थेपडे विद्यालयात मातृ-पितृ पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्युज )– तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील आज दि.१४रोजी दिवस ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.डी.चौधरी होते. तसेच व्यासपीठावर डॉ. गणेश चौधरी उपप्राचार्य जी.डी. बच्छाव ज्येष्ठ शिक्षक के. पी.पाटील कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. योगराज चिंचोरे…
