Headlines
Home » कृषी » Page 3

कपाशी बियाण्याची जादा दराने विक्री केल्याने म्हसावद येथे विक्रेत्यावर धडक कारवाई

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे कापूस बियाणे जादा दराच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे ६५९ या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने एका विक्रेत्याकडे डमी ग्राहक पाठवला. सदर केंद्रावर विक्रेत्याने ८६४ रुपये किंमतीचे कापूस बियाण्याचे पाकीट ह्या डमी ग्राहकास बाराशे रुपयांना विक्री करताना पथकाने…

Read More

जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ ; मंगळ ग्रह मंदीराचा स्तुत्य उपक्रम

शेतकऱ्यांपर्यंत माहिती व उच्च तंत्रज्ञान पोहचवु : अशोक जैन जळगाव | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था,…

Read More

मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

सोलापूर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या ९३ कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली आहे. त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा दर मिळालाय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांदा…

Read More

जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे-अथांग जैन; कार्बन क्रेडीट संदर्भात जैन हिल्स येथे भागधारक परामर्श बैठक उत्साहात

भागधारक परामर्श बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, शेजारी श्री सायन शुगर फॅक्टरी सायन सुरतचे चेअरमन राकेश पटेल, धर्मेश पटेल, डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. बी डी जडे, डॉ. के.बी. पाटील जळगाव | दि. २३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखण्यात…

Read More

कजगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे गुरांचा चारा खाक; महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | कजगाव येथील शेतकरी ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातील गुरांचा चारा दिनांक १७ रोजी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. सविस्तर वृत्त असे की ईश्वर जगन्नाथ पाटील यांच्या शेतातून महावितरणाच्या विजवाहक तारा गेलेल्या आहेत. दि१७ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास या तारांमध्ये स्पार्किंग होऊन शेतात गुरांसाठी…

Read More

पालक मंत्र्यांच्या हस्ते भूमिअभिलेख विभागास रोवर युनिट मशीन प्राप्त; अचूकता आणि पारदर्शकतेमुळे तंटे मिटणार

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट जळगाव ) – रावेर भूमिअभिलेख विभागास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १५ रोवर मशीनचे वाटप करण्यात आले. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार आहे. मोजणी करतांना अचूकता आणि पारदर्शकता येणार असल्याने सबंधित शेतमालक व लगतचे शेतमालक यांच्यात होणारे वाद मिटणार आहे. तसेच…

Read More

शेततळ्यांना जोडणाऱ्या बंदिस्त नलिका व गाळरोधक बंधाऱ्याच्या कामांचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते भुमिपूजन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज) – बोदवड परिसर सिंचन योजना ता. बोदवड जि. जळगाव या योजनेतील टप्पा -१ मधील ३२५४० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण (PDN) प्रणालीच्या कामासाठी मा. गिरीष महाजन, मंत्री, ग्राम विकास आणि पंचायती राज, व पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. योजनेस…

Read More

कृषी उत्पादनाला मिळणार डिजिटल ई-कॉमर्सचा मंच ; कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचं अनावरण

मुंबई | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात उत्पादित होणारे कृषी उत्पादने आणि शेतमालासाठी आता ऑनलाईन ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे…

Read More

महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन

पुणे | दि. ०६( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे यंदा संपूर्ण राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातून कोकणच्या या राजाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून महा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या विभागातील ५० हून अधिक शाखांनी विक्री करण्याची…

Read More

केळी पिक विमा २०२२/२३ जळगाव जिल्हा पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

जळगाव | दि. २७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – केळी फळपीक विम्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विविध प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. केळी पिकविमा २०२२-२०२३ मधील जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करुन पाहु शकतात….

Read More

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून गौरविण्यात येणार; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कृषि विभागाच्या विविध समित्यांच्या आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार असुन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आजच्या बैठकीत निर्णय घेतला. सविस्तर वृत्त असे की आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका…

Read More

हापुस आंब्याच्या हंगामाला सुरवात ; आवक वाढल्याने दर आवाक्यात

कोकण, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रात हापूस आंब्याचे दोन मुख्य हंगाम मानले जातात. ‘फेब्रुवारी ते मार्च’ आणि ‘एप्रिल ते मे’ , त्यानुसार पहिल्या हंगामात वाशीच्या घाऊक बाजारात दररोज दीड ते दोन हजार आंब्याच्या पेट्या येत आहेत. बाजारात हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे दर तुलनेने कमी झाले आहेत. घाऊक बाजारात दोन डझनाच्या कच्च्या हापूस…

Read More

निम्न तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यासाठी लागणाऱ्या वन जमीनीसाठी मान्यता अंतिम टप्यात

जळगाव दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३.१२ हेक्टर एवढी वन जमीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बुडीताखाली जाते. त्या जमिनीला तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव शेवटच्या टप्यात आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार…

Read More

कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर

दिल्ली दि. ३ ( प्रतिनिधी )भारतातील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ,आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) पद्धती वापरल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ‘किसान ई-मित्र’ हा एआय-संचालित चॅटबॉट आहे जो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रश्नांसाठी मदत करतो. एकापेक्षा अनेक भाषांना हा चॅटबॉट समर्थपणे मदत करतो . AI…

Read More
error: Content is protected !!