Headlines
Home » राजकीय » Page 5

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! पुन्हा एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

मुंबई | दि१७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – शिवसेना उबाठा गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जाणारे, ठाकरे गटाचे नेते आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला…

Read More

लोकसभा २०२४ चे बिगुल वाजले ; लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर

सात टप्प्यात निवडणुका ; पहिला टप्पा १९ एप्रिल तर शेवटचा १ जून , निकाल ४ जूनला नवी दिल्ली | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. देशात नविन मतदार विशेषतः महिला…

Read More

ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस ! छत्रपती संभाजीनगर लोकसभा उमेदवारीसाठी मी गेल्या १० वर्षापासून स्पर्धेत : अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर | दि.१६ (वास्तव पोस्ट न्यूज)– मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस समोर आली आहे. अंबादास दानवे यांनी आपली नाराजी व्यक्त केली असुन चंद्रकांत खैरे हे आपल्याला सातत्याने डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी लोकसभेसाठी आपण आग्रही असल्याचे सांगीतल्याने ठाकरे गटासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे….

Read More

भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नवनीत राणा यांचा प्लान बी तयार ! अमरावती लोकसभा सस्पेंस कायम

अमरावती | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपने लोकसभा २०२४ साठी महाराष्ट्रातील २० मतदारसंघातुन उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात जुन्यांबरोबर नव्यांनाही संधी दिली आहे. परंतु काही जागांवरून महायुतीत तेढ असल्याने, त्या जागांवर भाजपने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही. येत्या एक दोन दिवसात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ज्या जागांवर…

Read More

‘वैशालीताई तुम आगे बढो…’ च्या जयघोषाने दुमदुमला भडगाव तालुका

शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमांना तरूणाईसह महिला व ज्येष्ठांचा हिरीरीने सहभाग भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ‘गाव तिथे शाखा’ अभियानाच्या अंतर्गत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आज भडगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये पक्षाच्या शाखांचा शुभारंभ करण्यात आला असता त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात तरूणाईसह महिला आणि ज्येष्ठांचा सहभाग…

Read More

मतदान करतांना सर्वसामान्यांचे हाल डोळ्यासमोर ठेवा : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव तालुक्यात शाखांचे उदघाटन : ठिकठिकाणी भव्य स्वागत भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सध्या शेतकर्‍यांसह सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून आगामी निवडणुकीत मत देतांना हे हाल डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांना धडा शिकवा अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. त्या भडगाव तालुक्यातील शिवसेना शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमात…

Read More

भाजपकडून लोकसभेची दूसरी यादी जाहीर; जळगाव मतदारसंघातुन स्मिता वाघ, तर रावेर मधून रक्षा खडसे यांना उमेदवारी

नवी दिल्ली | १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपकडून २०२४ लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत बहुचर्चित भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना…

Read More

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे महिलांचा वाढता कल : वैशालीताई सुर्यवंशी

भडगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प असून मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचा सुध्दा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. या संदर्भातील वृत्त असे…

Read More

काँग्रेसची दुसरी यादी: मध्य प्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ६ राज्यांमधून ४३ नावे जाहीर केले आहेत. यामध्ये आसाममधून १२, राजस्थानमधून १०, मध्य प्रदेशातून १०, गुजरातमधून ७, उत्तराखंडमधून ३ आणि दमण बेटातून १ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची…

Read More

डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांनी बांधले शिव बंधन; ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीवर !

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगली लोकसभा मतदार संघातील युवा, तड़फदार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मातोश्रीवरील पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुमारे ५०० गाड्यांचा मोठा ताफा आणि असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी मातोश्रीवर जमली. याप्रसंगी चंद्रहार पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अबकी बार चंद्रहार, अशा घोषणांनी मातोश्री…

Read More

अखेर वसंत मोरेंकडून मनसेला जय महाराष्ट्र ; रात्री ‘एक्स’ वर व्यक्त केली होती नाराजी

पुणे | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस पुणे शहराचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रात्री फेसबुकवरुन त्यांनी एक पोस्ट केली होती की, ‘आता मला कोणाकडुनही अपेक्षा नाही’. त्यानंतर या पोस्ट वरुन वेगवेगळे तर्क वितर्क निघू लागले. दुपारी ‘साहेब मला माफ करा जय महाराष्ट्र’, अशी एक नवीन…

Read More

अखेर रवींद्र वायकरांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ ! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

मुंबई | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी कालच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या शिवसेना शाखांना भेटी दिल्या, जोगेश्वरीमध्ये रवींद्र…

Read More

लोकसभा २०२४ : भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; कोण कुठून लढणार ?

नवी दिल्ली | दि. ०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात १९५ उमेदवारांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांचा समावेश आहे. २८…

Read More

जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर ? प्रश्नावर काय म्हणाले संजय राऊत !

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एका कार्यक्रमात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली स्पस्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे…

Read More

शिवसेना ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर ; रोशनी शिंदे युवासेनेच्या सहसचिव

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी आज जाहीर झाली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये १२ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलींचा समावेश आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचीही कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली…

Read More
error: Content is protected !!