Headlines
Home » क्रीडा » Page 12

५१व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ग्वाल्हेर जैन इरिगेशन संघास विजेतेपद

कुलपती इंदू बोरा यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारतांना जैन इरिगेशनच्या संघातील खेळाडू डावीकडून सर्वश्री रहीम खान, पंकज पवार (कर्णधार), संदीप दिवे, सय्यद मोहसिन (संघ व्यवस्थापक), योगेश धोंगडे, अभिजीत तिरुपणकर व जैद अहमद फारुकी. ग्वाल्हेर | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे दिनांक ६ ते १० एप्रिल दरम्यान लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे…

Read More

विशाल पाटील याची जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी संघात निवड

जळगाव | दि.२(वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल पाटील याची फिनलंड येथे होणाऱ्या जागतिक फ्लोरबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय फ्लोरबॉल संघामध्ये निवड करण्यात आली. या निवडीमुळे विशाल पाटील याचा एस एस मणियार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश…

Read More

टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भडगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– टोणगांव येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्षा मिना बाग, मुख्याध्यापिका मिरा साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रांगोळी स्पर्धेत सहभागी महिला पालकांनी मोठ्या संख्खेने सहभाग नोंदविला होता. अनुक्रमे प्रथम…

Read More

आरसीबीने प्रथमच डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले ; दिल्ली कॅपिटल्सचं दुसऱ्यांदा भंगलं स्वप्न

नवी दिल्ली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२४ चे विजेतेपद जिंकले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा ८ विकेट्सने पराभव करत चमकदार ट्रॉफीवर कब्जा केला. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. दुसरीकडे दिल्लीला…

Read More

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा दबदबा कायम; विदर्भाला नमवत ४२व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकुन इतिहास घडवला आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईने विदर्भासमोर विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विदर्भानेही जोरदार खेळ करत चौथा दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही जोरदार खेळ सुरु केला. जिंकण्याच्या उद्देशाने…

Read More

मुंबईची ४२ व्या विजेतेपदाकडे जोरदार वाटचाल; विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे तगडे आव्हान

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुशीर खानचे शतक व अजिंक्य रहाणे, शम्स मुलाणी व श्रेयस अय्यरची तुफानी अर्धशतके यांच्या जोरावर यजमान मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. आता विदर्भसमोर विजयासाठी ५३८ धावा करण्याचे आव्हान असून सामन्याचे दोन दिवस अद्याप बाकी आहेत. मुंबई विक्रमी विजेतेपदाच्या…

Read More

भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आखाडा पूजन

भडगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील सोमेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. याला पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या संदर्भातील माहिती अशी की, महाशिवरात्रीचे औचित्य साधून परंपरेनुसार शहरातील सोमेश्‍वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाच्या विद्यमाने कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक नरेंद्रसिंगदादा…

Read More

तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने एक डाव ६४ धावांनी इंग्लंडला लोळविले; मालिका ४-१ च्या फरकाने जिंकली

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या अंतिम कसोटी सामन्यात एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवून टीम इंडिया ने पाच सामान्याची ही मालिका ४-१ अश्या मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिल्या डाव २१३ धावांत गडगडला होता. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने काल दुसऱ्या दिवशीचा…

Read More

अँडरसनने वयाच्या ४१व्या वर्षी रचला इतिहास ; ७०० कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचव्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाची मजबूत पकड असुन सामना जिंकण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान इंग्लंडच्या ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज सकाळी मोठा इतिहास रचला. कुलदीप यादवला बाद करताच कसोटी कारकिर्दित विकेट्सचा विक्रम रचणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. धर्मशाळा कसोटीत इंग्लंडचा वेगवान…

Read More

धर्मशाला कसोटीत रोहित व गिलचे शतकं ; दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २५५ धावांची आघाडी

धर्मशाला | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धर्मशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने…

Read More

धर्मशाला कसोटीत भारताचे वर्चस्व; कुलदीप ५,अश्विनचे ४ बळी : जैस्वाल, रोहितचे अर्धशतकं

धर्मशाला | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आज ०७ मार्च पासून धर्मशाळा येथे सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पहिल्या गड्यासाठी ६४…

Read More

प्रतिक्षा संपली; Fly 91 एअरलाइनला जळगाव-पुणे, जळगाव-गोवा आणि जळगाव-हैदराबाद मार्ग मोकळा

जळगाव | दि.०६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावला पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, Fly 91 एअरलाइनला DGCA कडून त्याचे एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) मिळाले. यामुळे आता फ्लाय 91 एअरलाइन लवकरच उड्डाण सुरू करू शकणार आहे. Fly91 च्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच…

Read More

‘महा स्पीडस्टार :शोध महा वेगाचा’ महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोहिमेस मिळतोय उदंड प्रतिसाद जळगाव | दि.०५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम हाती घेतली आहे. ९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या…

Read More

क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन ; रोहित राजस्थानचा माजी रणजीपटू

मुंबई | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालं. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं ७ रणजी…

Read More

टी-२० क्रिकेटमधील नवा विश्वविक्रम ;जॅन ईटनचे अवघ्या ३३ चेंडूंतच शतक

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाची जागतिक कीर्तिमानाची नोंद जॅन निकोल लॉफ्टी ईटनच्या नावावर झाली आहे. नामिबियाचा मध्यफळीतील या फलंदाजाने नेपाळविरुद्ध अवघ्या ३३ चेंडूंत शतक झळकावले. टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम कुशलच्या नावावर होता. कुशलने ३४ चेंडूंत शतक झळकावले होते. जॅन निकोल लॉफ्टी ईटनने ३६…

Read More
error: Content is protected !!