Headlines
Home » क्रीडा » भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आखाडा पूजन

भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आखाडा पूजन

भडगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील सोमेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. याला पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या संदर्भातील माहिती अशी की, महाशिवरात्रीचे औचित्य साधून परंपरेनुसार शहरातील सोमेश्‍वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाच्या विद्यमाने कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यानंतर कुस्त्यांची स्पर्धा रंगली. यातील विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, अतुल, पाटील, डी.डी. पाटील, उमराज पाटील, मंगलसिंग परदेशी, बापू पाटील, महेंद्र पाटील, अनिल टेकडे, बाळु पाटील, भागवत देवरे, ज्ञानबा सूर्यवंशी, रमेश भदाणे, रवी अहिरे, जाकिर कुरेशी, देवा अहिरे आदी मान्यवरांसह सोमेश्वर पंच मंडळ सहकारी उपस्थित होते. तर कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!