Home » जळगाव » मु जे महाविद्यालयात २०२५-२६ साठी करीयर संसदेची स्थापना

मु जे महाविद्यालयात २०२५-२६ साठी करीयर संसदेची स्थापना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) :  येथील के सी ई मुळजी जेठा महाविद्यालयात २०२५-२६ साठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र करियर संसदेची स्थापना करण्यात आलेली आहे. करीयर कट्टा अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये संसदेची निवड करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांकडुन नावे मागवण्यात आली आणि विद्यार्थी संसदेत नावे नोंदविलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून प्राचार्य प्रा. संजय ना. भारंबे आणि करीयर कट्टा समन्वयक डॉ. शमा सराफ यांनी प्रक्रीया पुर्ण केली. करीयर संसद मुख्यमंत्री निलम पाटिल आणि इतर सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे अभिनंदन के सी ई चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, मॅनेजमेंट काॅन्सिल सदस्य अॅड प्रविणचंद्र जंगले आणि श्री यशवंत शितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांनी केले. या संपुर्ण प्रक्रीयेत डॉ. राजीव पवार, डॉ. मनोज महाजन, डॉ. राम बुधवंत, डॉ. विवेक यावलकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!