मुंबई, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बिहारमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे बिहारधील राजकीय वातावरण तापलं असून आज १२ रोजी एनडीए सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र एनडीएच्या बहुमत चाचणी पूर्वीच विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडून मोठ्या घडामोडीला सुरवात झाली. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बिहार विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव विधानसभेच्या कामकाजाच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. नितीश सरकार विश्वासमत सादर करण्याआधी या अविश्वासावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या ३८ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केल्याची माहीती समोर येत आहे. आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते मनोज झा म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी एकूण १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो.
बिहारमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असुन रविवारी भाजपने आपल्या आमदारांना नजरकैदेत ठेवले. काँग्रेसने आपले आमदार हैदराबादला पाठवले आहेत. तर शनिवारी आरजेडीच्या आमदारांना तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आपल्या मुलाला नवीन सरकारमध्ये खातेवाटप संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
