नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ): नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. अशातच या निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच ४ जानेवारी २०२५ पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच ४ जानेवारी २०२५ पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा
महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत ८१ सदस्य आहेत. या राज्यात २०१९ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये ९० जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेल आहे. याआधी २०१४ मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.
