Headlines
Home » जळगाव » तलाठ्यास ५ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक ; रेती वाहतुकीसाठी लाचेची मागणी

तलाठ्यास ५ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक ; रेती वाहतुकीसाठी लाचेची मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील विटनेर येथील रविंद्र काशिनाथ पाटील या तलाठ्यास रेतीच्या वाहतुकीसाठी ५ हजाराची लाच स्विकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराच्या सासऱ्याचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजुर झाले होते. त्याच्या बांधकामासाठी तक्रारदारास रेतीची आवश्यकता होती.

दरम्यान रेतीच्या वाहतुकीसाठी तलाठी रविंद्र पाटील याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २७ मे रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची एसीबी कार्यालयाने २८ मे रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठ्याने १० हजारांऐवजी ५ हजार रुपये घेण्याचे ठरले.

त्यानंतर ठरलेल्याप्रमाणे एसीबी पथकाने सापळा लाऊन तक्रारदाराकडून तलाठ्याने ५ हजाराची लाच स्विकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. प्रणेश ठाकुर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत मदत पथकात पोलिस निरिक्षक एन.एन. जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!