Home » क्रीडा » अँडरसनने वयाच्या ४१व्या वर्षी रचला इतिहास ; ७०० कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

अँडरसनने वयाच्या ४१व्या वर्षी रचला इतिहास ; ७०० कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचव्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाची मजबूत पकड असुन सामना जिंकण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान इंग्लंडच्या ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज सकाळी मोठा इतिहास रचला. कुलदीप यादवला बाद करताच कसोटी कारकिर्दित विकेट्सचा विक्रम रचणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.

धर्मशाळा कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने वयाच्या ४१ व्या वर्षी हा इतिहास रचला. अँडरसनने भारताच्या पहिल्या डावात कुलदीप यादवला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये आपले ७०० बळी पूर्ण केले आहेत. कुलदीप यादवला बेन फॉक्सच्या हाती झेल बाद केलं.

जेम्स अँडरसनने मे २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. २१ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अँडरसनने १८७ कसोटी सामन्यात त्याने २६.५२ च्या इकॉनॉमीने ७०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. इंग्लंडकडून ७०० कसोटी विकेट घेणारा अँडरसन पहिला गोलंदाज ठरला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत माजी फिरकीपटू शेन वॉर्न ने ७०८ आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनच्या नावावर ८०० कसोटी बळी आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!