Home » जळगाव » ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘अखंड ध्यान ज्योत बैठक’ चे आयोजन

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘अखंड ध्यान ज्योत बैठक’ चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘तेज ज्ञान फाउंडेशन’ च्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड ध्यान ज्योत धारणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी यात आपला सहभाग नोंदवला.

दैनंदिन जीवनात ध्यान धारणेचं महत्व काय असतं हे या निमित्ताने समजले. आज दि.१८ रोजी सकाळी १०.१० वाजेपासून तर उद्या दि.१९ रोजी ११ वाजून ११ मिनिटानपर्यंत आपण आपला सहभाग या साधनेत नोंदवू शकतात असे तेज फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्रीधर सुनकरी, उपप्राचार्या रजनी गोजोरेकर व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा अंजली वर्मा यांनी समजावून सांगितली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!