जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर तर्फे प्र. कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा संबंधी समस्यांना घेऊन एक निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मुख्यत्वे परीक्षा विषयक उडालेला गोंधळ, उत्तर पत्रिकेची गुणवत्ता पूर्ण तपासणी तसेच परीक्षेला उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवलेल्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडण्यात आले. येत्या काही दिवसात या सर्व प्रश्नांवरती योग्य उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी विभाग संयोजक भविन पाटील, जळगाव महानगरमंत्री मयूर माळी, नगरमंत्री चिन्मय महाजन, रोहित सूर्यवंशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
