Home » जळगाव » मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

मकरसंक्रांतीच्या पर्वावर जळगाव येथे किरीटभाईजींच्या सान्निध्यात भव्य प्रवचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात संत मा. किरीट भाईजी यांची जागतिक कीर्ती पसरली आहे. त्यांनी देश विदेशात श्रीमद्भागवत, शिवपुराण, राम कथा, हनुमान कथा इत्यादी अध्यात्मिक विषयांवर निरूपण केलेले आहे अशा महान संतांचा लाभ भाविकांना होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!