Home » सामाजिक » समतोल प्रकल्पा तर्फे बाल गोपाळ यांच्या समवेत मकर संक्रांत सण साजरा.

समतोल प्रकल्पा तर्फे बाल गोपाळ यांच्या समवेत मकर संक्रांत सण साजरा.

जळगाव, दि.१५ संदिप रंधे (वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे जळगाव येथील मेहरून परिसरातील राहणाऱ्या बालकांच्या समवेत मकर संक्रांत सण उत्सवात साजरा.
आज सर्व भारतभर मकर संक्रांत सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवून आनंद लुटताना नागरिक व मुले दिसून येतात. संक्रांती निमित्ताने तिळगुळ देऊन, तिळगुळ घ्या …. गोड गोड बोला…. असे बोलण्याची परंपरा आपणास दिसून येते. मोठे मोठे पतंग उत्सव साजरे करण्यात येत असतात. मात्र झोपड पट्टी परिसरातील बालकांनी ही सण साजरा करावा. या उद्देशाने कचरा वेचणाऱ्या , भीक मागणाऱ्या बाल भिकारी, शाळा बाह्य मुलांसाठी, बिकट परिस्थितीतील गरजवंत मुलांसाठी मकर संक्रांत गोड व्हावी.या हेतूने बालकांना तिळगुळ देऊन शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले. यावेळी तिळगुळ घेताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. जमलेल्या रहिवाशी यांना मकर संक्रांत शुभेच्छा देण्यात आल्या. समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री .प्रदीप पाटील टीम सदस्य विश्वजीत सपकाळे, रविना भगत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!