एरंडोल वास्तव पोस्ट -(प्रतिनिधी )दि.११ एरंडोल शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले.सर्व संपूर्ण निकाल हा दबावतंत्र वापरून दिला गेला आहे असे ही त्यांनी या वेळी सांगितले .येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता कोणासोबत आहे हे दिसून येईल व खरा शिवसैनिक व शिवसेना ही फक्त उद्धव साहेबांची आहे असे दिसून येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी उपजिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक रुपेश महाजन, माजी नगरसेवक शहर प्रमुख सुनील चौधरी, शहर प्रमुख प्रमोद महाजन, युवा सेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवा सेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, उप तालुकाप्रमुख प्रसाद दंडवते,युवासेना शहर प्रमुख जयेश महाजन, शहर समन्वयक परेश बिर्ला, उपशहर प्रमुख सुनील मराठे, माजी शहर प्रमुख राजा भेळसेकर, अरुण महाजन, ग्राहक सेवा प्रमुख चंदू जोहरी, वैद्यकीय आघाडी प्रमुख राजेश महाजन, युवा सेना तालुका समन्वयक अमोल भावसार, राजेंद्र ठाकूर, पिंटू भोळे,नितीन महाजन, गजानन महाजन, अतुल मराठे, रवींद्र चौधरी,भुरा महाजन, अरुण महाजन, गोपाल अण्णा महाजन ,किरण महाजन ,किरण चौधरी ,राहुल महाजन ,भरत महाजन प्रसाद महाजन, माजी सरपंच किशोर पाटील,कमलेश सोमानी व शिवसैनिक युवासेनिक उपस्थित होते.

