Headlines
Home » जळगाव » ‘युवारंग २०२५’ महोत्सवाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

‘युवारंग २०२५’ महोत्सवाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग व जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवारंग २०२५’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गेल्या २५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंत्री महाजन यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून समस्त युवावर्गाला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला व महोत्सवाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, रायसोनी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सुनील रायसोनी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!