Headlines
Home » जळगाव » आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक स्तरावर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे शनिवार दि २१ जून २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने केंदिय संचार ब्यूरो शाखा जळगाव आणि मू.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांचे संयुक्त विद्यमाने ‘योग संगम’ या सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक २१ रोजी सकाळी ६:४५ वाजता महाविद्यालयाच्या स्केटिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेला आहे.

यावेळी कॉमन योगा प्रोटोकॉल अर्थात योग साधनेचे प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी आणि योगप्रेमी साधकांकडून करून घेण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वामीनारायण मंदिर जळगाव येथील स्वामी नयनप्रकाश हे उपस्थित असतील. त्याचबरोबर मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, प्राचार्य अशोक राणे, प्राचार्य सुषमा कंची, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, प्राचार्य युवा कुमार रेड्डी, शशिकांत वडोदकर प्रशासकीय अधिकारी के.सी.ई. सोसायटी तसेच कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, लेफ्टनंट आश्विन वैद्य इत्यादी मान्यवर उपस्थित असतील.

योग दिनानिमित्त दि २३ जून ते ३० जून या कालावधीत महिलांसाठी निःशुल्क योग थेरपी शिबिराचे आयोजन सुद्धा सोहम योग विभागामध्ये संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत त्रिवेणी समूहाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!