Home » शैक्षणिक » एमटीएस परीक्षेत वेदांत बऱ्हाटेराज्यात पहिला

एमटीएस परीक्षेत वेदांत बऱ्हाटेराज्यात पहिला

भुसावळ (वास्तव पोस्ट ) :एमटीएस परीक्षा २०२३-२४ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत वेदांत बऱ्हाटे हा इयत्ता चौथी वर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. वेदांतचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये एमटीएस परीक्षा संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये सेंट आलायसिस हायस्कूल मधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी वेदांत विकास बऱ्हाटे याने राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला या विद्यार्थ्याला स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व तीन हजार रुपयांच धनादेश एमटीएस परीक्षेचे संस्थापक सुभाष महाजन यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांचे आई-वडील यांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी सेंट अलायसिस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मेरी सेलमा, सेंट अलायसिस इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका रोझ मेरी, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे चेअरमन सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!