Home » जळगाव » झांबरे विद्यालयात शैक्षणिक सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

झांबरे विद्यालयात शैक्षणिक सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी शैक्षणिक सप्ताह साजरा होत आहे. हा शैक्षणिक सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहात अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब दिवस, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस याबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गणित विषयात अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत संख्याज्ञान शैक्षणिक साहित्याच्या आधारे शिकवण्यात आले.

क्रीडा दिवस अंतर्गत एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी खेळाडूंना विविध खेळाविषयीची माहिती दिली. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी खेळ किती महत्त्वाचे आहेत, हे स्पष्ट केले. सर्व खेळाडूंनी खेळाविषयीची शपथ घेतली. तसेच पारंपरिक लेझीम खेळाचे प्रशिक्षण विवेक मोरे आणि सुनील बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!