पाचोरा | दि.०४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथे सुरू असलेल्या पीरबाबांच्या यात्रेत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला.
अंतुर्ली बुद्रुक या गावातील पिरबाबाची यात्रा विख्यात असून यात परिसरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी भेट दिली. त्यांनी पीरबाबांवर चादर चढवून आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
