भडगाव |१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे पवित्र रमजान ईदनिमित्त आयोजीत शिरखुर्मा पार्टीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. अलीकडेच पवित्र रमजान ईद उत्सव अतिशय चैतन्यदायी वातावरणात साजरा झाला होता. यानिमित्ताने भडगावात हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेरखान पठाण यांनी केले होते. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी या देखील सहभागी झाल्या. त्यांनी उपस्थिती समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भडगावचे माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहूल पाटील, माजी नगरसेवक विजय देशमुख, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जनाब शेरखान, भिवंडीचे माजी उपमहापौर हाजी रऊफ खान, महिला राष्ट्रवादी अध्यक्षा रेखा पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, शिवसेना शहरप्रमुख शंकर मारवाडी, मनीषा पाटील पारोळा, भिकनूर पठाण, दिपक पाटील, रेखा पाटील, जाकीर कुरेशी, रफा दादा, रविंद्र महाजन, मोसीन खान, राजू शेख, युसुफ, राजू पठाण, विक्रम सोनवणे, राष्ट्रवादीचे राहूल पाटील, युवासेनेचे चेतन पाटील, नरेंद्र सुर्यवंशी, रोहन परदेशी, अमोल पाटील, नवल राजपूत, करण पाटील, साकीब मिर्झा, नाहीद कुरेशी आदी उपस्थित होते.
