Headlines
Home » जळगाव जिल्हा » नवीन शैक्षणिक धोरण व मूल्यांकन समजून घ्या : केंद्र प्रमुख अशोक तायडे

नवीन शैक्षणिक धोरण व मूल्यांकन समजून घ्या : केंद्र प्रमुख अशोक तायडे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षकांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वतःच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी सज्ज व्हा, आपल्या विद्यार्थ्यांमधील विविध क्षमता वाढीस लागण्यासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन केंद्र प्रमुख अशोक तायडे यांनी केले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्स उपक्रम आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पु.ग. बऱ्हाटे विद्यालयात ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ५ दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण पहिला टप्पा आयोजित करण्यात आले असून, तालुक्यातून प्राथमिक १५० व माध्यमिक १५० असे एकूण ३०० शिक्षक सहभागी झाले आहेत. माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण प.क. कोटीच्या विद्यालयात होत आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक गुणवंत पाटील व निलेश पाटील यांनी केले.

तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान व बी.डी. धाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.  या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी समन्वयक सचिन पाटील, सुनील वानखेडे, राहुल भारंबे, अल्पेश कुंभारे, जीवन महाजन, रवींद्र पढार उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय- शैक्षणिक धोरण २०२०, क्षमताधारीख मूल्यांकन, क्षमताधिष्टीत प्रश्न निर्मिती, नवी आव्हाने पेरणारे शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, व्यावसायिक शिक्षण, समग्र प्रगती पत्रक, शिकण्याला प्राधान्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!