Headlines
Home » महाराष्ट्र » तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! अश्विनी भिडे पहिल्या महिला आयुक्त

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

राज्य प्रशासकीय सेवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे फेरबदल केले असून अनेक वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदलांमध्ये मुंबई महापालिकेला त्यांच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या असून, डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांच्याकडेही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेची धुरा ‘मेट्रो वूमन’कडे

मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्या रूपाने मुंबई महापालिकेला पहिल्या महिला आयुक्त मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (MMRC) प्रमुखपद देखील कायम राहणार आहे. मेट्रो प्रकल्पांमधील त्यांच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात वर्णी

आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असलेल्या मुंढे यांची आता मंत्रालयातील मदत आणि पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता माणिक गुर्सल हे दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार पाहतील.

प्रशासकीय बदल्यांची अधिकृत यादी

अ.क्र.अधिका ऱ्याचे नावबॅचनवीन पद / जबाबदारी
लोकेश चंद्र१९९३अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय (CMO)
अश्विनी भिडे१९९५आयुक्त, मुंबई महानगरपालिका (BMC)
विकास चंद्र रस्तोगी१९९५अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभाग (वित्तीय सुधारणा)
विनिता वैद सिंघल१९९६प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग
परिमल सिंह२००४सचिव, कृषी विभाग, मंत्रालय
तुकाराम मुंढे२००५सचिव, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभाग
लहू माळी२००९एमडी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि.
मनीक गुरसल२००९सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
प्रेरणा देशभ्रतार२०१०आयुक्त, मत्स्य विभाग, मुंबई
१०बी. पी. पृथ्वीराज२०१४आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

विशेष विश्लेषण:

या बदल्यांच्या निमित्ताने राज्य सरकारने अनुभवी अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागांवर बसवले आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अश्विनी भिडे यांची नियुक्ती आणि मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवरील फेरबदल हे आगामी काळातील प्रशासकीय नियोजनाचा भाग मानले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!