Home » महाराष्ट्र » नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या विस्तारासाठी २३३ एकर जागेचे हस्तांतरण

नागपूर येथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या विस्तारासाठी २३३ एकर जागेचे हस्तांतरण

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : ‘सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस’ ही भारतातील अग्रगण्य कंपनी नागपूर येथे आपला विस्तार करीत आहे. या माध्यमातून अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहान तर्फे २३३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्रम महाराष्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासासाठी अधिक बळकटी देणारा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले. याप्रसंगी संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, सोलारचे वरिष्ठ अधिकारी जे.एफ साळवे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम, संजय इंगळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!